PostImage

Zadipatti VC News and Business

Sept. 26, 2024   

PostImage

आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी युवकांनी मैदानी खेळ खेळावे- मा.खा.अशोक नेते यांचे …


 

दिं. २६ सप्टेंबर २०२४

आष्टी:-  युवकांचा मैदानी उत्साह वाढविण्यासाठी आज दिं. २६ सप्टेंबर ला श्री..छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था,व श्री.छत्रपती शिवाजी महाराज फुटबॉल क्लब आष्टी द्वारा भव्य  फुटबॉल सामन्याचे आयोजन महात्मा ज्यो.फुले हाँय.च्या पटांगणात करण्यात आले होते.

माजी खासदार अशोकजी नेते यांनी फित कापुन व दीपप्रज्वलन करत  पायाने फुटबॉल उडवून सामन्यांचे उद्घाटन केले. या फुटबॉल सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी बोलतांना आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आजच्या काळी मैदानी खेळ अतिशय महत्त्वाचे आहे.कारण आजचे अनेक युवक वर्ग हे दिवसेंदिवस  मोबाईल मध्यें व्यस्त असतांना दिसते अशावेळी त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही.यासाठी शरीर तंदुरुस्तीसाठी व निरोगी राहण्यासाठी अशा मैदानी खेळाचे अतिशय आवश्यक आहे. आपण हा फुटबॉलचे सामन्यांचा खेळ एक हप्ता चालतोय आपण चांगल्या पद्धतीने व वादविवाद न करता पंचांचा निर्णय अंतिम मानून खेळ खेळावे.असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी माजी खासदार अशोकजी नेते यांनी केले.

या फुटबॉल प्रतियोगितेचे प्रथम पुरस्कार मा.खा.श्री. अशोकजी नेते यांचेकडून ५१,००१/- व शिल्ड पोलीस निरीक्षक काळे यांचेकडून द्वितिय पुरस्कार जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी मोर्चाचे जिल्हा प्रभारी डॉ.मिलिंदजी नरोटे यांच्याकडून ३१,००१/- व शिल्ड तृतीय पुरस्कार आमदार देवरावजी होळी यांचेकडून २१,००१/- व शिल्ड महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे ह्यांचेकडून चतुर्थ पुरस्कार ॲड.विश्वजीत कोवासे यांचेकडून ११,००१/-व शिल्ड एफ.डी. सी एम यांचेकडून अशा पद्धतीने आयोजन करण्यात आले.

यावेळी फुटबॉल प्रतियोगितेच्या कार्यक्रमाला मंचावर प्रामुख्याने प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव जी कोहळे,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिलजी तिडके, सहकार आघाडीचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष भाऊ पिपरे,आष्टीच्या सरपंच बेबीताई बुरांडे,आष्टीचे पोलीस निरिक्षक विशाल काळे,पांडे सर,बैस सर, प्राचार्य साहेब व शिक्षकवृंद, रतन पोतगंटवार,अशित बैरागी,योगेश बिशवास, शुभम हावलादार, तसेच मोठया संख्येने गावातील नागरिक व खेळाडू तसेच विद्यार्थीनी उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

July 12, 2024   

PostImage

BSP MISSION MEMBERSHIP : बसपा आजी माजी पदाधिकार्यांनी मोठ्या उत्साहात …


बहुजन समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मा. सुनीलजी डोंगरे यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यात नवीन सदस्य नोंदणी मोहीमेला सुरुवात।                                                                   

गडचिरोली/11:- बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. सुनील डोंगरे साहेब महाराष्ट्रात झंझावाती दौरा सुरू आहे. यादरम्यान आज दिनांक 11/07/2024 ला दुपारी 12:00 वाजता बहुजन समाज पार्टी गडचिरोली पदाधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष यांनी सर्व आजी माजी  पदाधिकारी व कार्यकर्त्याचे मनोगत घेतले आणि लोकसभा निवडणुकीचा अहवाल घेतला तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली. तसेच बहुजन समाज पक्षाच्या वतीने नविन सदस्य नोंदणी करण्यासाठी 50/- रुपये सदस्य नोंदणी पावती असल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील लोकांपर्यंत पदाधिकारी, व कार्यकर्ता संपर्क मोहीम राबविण्यात यावी असे मार्गदर्शन केले. यावेळी बहुजन समाज पार्टीचे माजी प्रदेश सचिव श्री. रमेश मडावी, माजी जिल्हाध्यक्ष वामन राऊत, जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट, दुष्यांत चांदेकर साहेब, मंदीप गोरडवार विधानसभा अध्यक्ष गडचिरोली, सुधीर वालदे, डॉ.सुनील बागडे, कैलास खोब्रागडे, सोनटक्के साहेब, नरेश महाडोळे, लडु वाडके, सुमन क-हाडे, वेणुताई खोब्रागडे, भावना खोब्रागडे, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 22, 2024   

PostImage

आंबेशिवणी येथील शेतामध्ये जंगली हत्तीचा धुमाकूळ


 

 

प्राप्त माहितीनुसार आंबेशिवणी येथील शेतकरी प्रेमिला पुंडलिक म्हस्के आणि पुंडलिक तुळशिराम म्हस्के यांनी उन्हाळी रब्बी फसल सहा एकर मध्ये धान शेतीची लागवड केली आहे, काल दिनांक २१ एप्रिलच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास जंगली हत्तीचा कळप आंबेशिवणी येथील प्रेमिला पुंडलिक म्हस्के आणि पुंडलिक तुळशिराम म्हस्के यांच्या शेतामध्ये सर्वे अनुक्रमांक १४१/३, १४८/२, १४८/३ मध्ये शेतकुंपण तोडुन शिरले आणि दोन ते तीन एकर क्षेत्रामध्ये अक्षरशः हौदोस घातला, यामध्ये शेतातील पाईपाची तोडफोड केली, धान्य पिक पायांनी तुडवुन पिकाची खुप मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे,अशातच शेतक-यांच्या हाती आलेले पिक आता भुईसपाट झाल्यामुळे शेतक-यांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि शेतक-याच्या कुंटुबांवर खुप मोठे आर्थिक संकट उभे झाले आहे, त्यामुळे वनविभागाने तात्काळ शेतक-यांच्या पिकाचे पंचनामे करुन त्वरीत आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे, आणि वनविभागाने जंगली हत्तीचे त्वरीत बंदोबस्त करावे अशी मागणी परिसरातील शेतकरी करू लागले आहेत.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024   

PostImage

Elephant rampage in Viheergaon


 

 Gadchiroli : Bureau, The wild elephants that have entered Gadchiroli district from the state of Odisha show no signs of abating. Every day crops are being damaged by wild elephants in some areas. Wild elephants have been on the rampage in Desaiganj taluka for the past few days. On Saturday night, elephants entered the paddy field in Vihirgaon sub-area under Desaiganj forest area.

 

And Carly Peek was literally trampled. Due to this, farmers have to face losses again. Farmers are shocked to see the scene of damage. According to information received, a herd of wild elephants has been roaming in the village area of Armori and Desaiganj forest area for more than one month. But these crops are being targeted by wild elephants.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 1, 2024   

PostImage

देसाईगंज तालुक्यात पुन्हा हत्तीचा धुमाकूळ सुरू...


दोन हत्ती कळपातून भरकटले अन् रोवणीचे पन्हें तुडविले !

 

शेतकरी दहशतीत : देसाईगंज तालुक्यात पुन्हा धुमाकूळ सुरू

 

देसाईगंज : रानटी हत्तींच्या कळपाचा देसाईगंज तालुक्यातील वडसा वनपरिक्षेत्राच्या जंगलात गेल्या महिनाभरापासून वावर आहे. हा कळप अधूनमधून कधी जंगलात तर कधी शेतशिवारात येत असतो. दरम्यान रविवार व सोमवारी हत्तींनी रोवणीला आलेले धानाचे पन्हे तुडविले. त्यामुळे तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये पुन्हा हत्तीविषयी दहशत निर्माण झाली आहे.

 

वडसा वनपरिक्षेत्रात हत्तींचा वावर महिनाभरापासून आहे. रविवारी रात्री कळपातील दोन हत्ती भरकटले. हे हत्ती चिखली गाव परिसरात दाखल झाले व त्यांनी रोवणीला आलेले पीक पायाखाली तुडविले. विशेष म्हणजे, सोमवारी सकाळी दोन हत्ती दिसल्याने चिखलीसह परिसरातील लोकांमध्ये भीती पसरली आहे. रानटी हत्तींचा कळप वडसा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या विहीरगाव येथील एफडीसीएमच्या कक्ष क्रमांक ८०, ८१, ८२ ते वन उपविभागाच्या ८४, ८५ जंगलात वावरत आहे. हत्तींच्या ह्या कळपाने चिखली परिसरात एन्ट्री करून धान पन्हे तुडविले. याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सोमवारी वनविभागाच्या पथकाने नुकसानीचा पंचनामा केला.

 

 

गोंगाटामुळे हत्ती बिथरले?

 

वडसा वनपरिक्षेत्रातील काही कक्ष हे एफडीसीएमच्या अधिकार कक्षेत येतात. ह्या ठिकाणी लाकडाचे बीट आहेत. व त्याची वाहतूक ही अवजड वाहनांमार्फत केली जाते. याच परिसरात हत्तींचा वावर आहे. वाहनांचा कर्कश आवाज व मजुरांचे आवागमन आदी कारणांमुळे हत्ती बिथरत आहेत. यावर वडसा वनविभागाने उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे, वाढोणा येथे हत्तिणीच्या मृत्यूनंतर हत्तींचा कळप शांत झाला होता.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 16, 2024   

PostImage

पिंपळगाव परिसरात रानटी हत्तींचा कळप ठाण मांडून


उन्हाळी धानाच्या पह्यांचे करताहेत नुकसान

 

 मोहटोला (किन्हाळा) : वाढोणा जंगल परिसरात एक जंगली हत्ती विद्युत शॉकमुळे गतप्राण झाला. ती हत्तीण होती. त्यानंतर हा कळप भगवानपूर जंगलमार्गे विहीरगाव- पिंपळगाव (ह.) जंगलव्याप्त भागातील भीमनखोजी येथील परिसरात स्थिरावला आहे. रात्रीच्या वेळेस शेतशिवारात चराईसाठी निघत असतो. पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतित आहेत. रब्बी पिकांकरिता दहा दिवसांपूर्वी

 

पन्हे टाकण्यात आले. आता पन्हे जमिनीच्या वर आली असून, हिरवीगार आहेत. हत्तींनी पन्ह्यांची नासधूस करणे सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या चिंतित भर पडत आहे. बाजारातून विकत घेऊन आणलेली बिजाई आहे. आता परत पन्हे टाकले तर ते येणार कधी? आणि टाकून झाल्यानंतर पुन्हा हत्तींनी तुडविले तर रोवणी करायची नाही काय, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. सुरुवातीलाच असे नुकसान होत असल्याने आता पुढे काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

 

नुकसान होऊनही पंचनामा करण्यास वनविभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. आम्हाला नुकसानभरपाई मिळत नसेल तर जंगलातील हत्तींचा कळप शेतशिवारात येणार नाही अशीउपाययोजना वनविभागाने करावी, अशी मागणी होत आहे. सातत्याने नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतित सापडले आहेत.

 

क्षेत्र सहायक म्हणतात.. पन्हे पुन्हा येतात

 नुकसानीचा पंचनामा करण्याबाबत शेतकरी वनक्षेत्र सहायक कैलास अंबादे यांना फोन करतात तेव्हा, हत्तींनी पायदळी तुडवलेले पन्हे पुन्हा मोठे होतील. पन्हे पायदळी तुडवल्याने कोणतेही नुकसान होत नाही. पिके दोन-तीन फुटांचे झाले असते तर पाहणी करून पंचनामा करता आला असता व नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असता. अशी प्रतिक्रिया देत आहेत.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 14, 2024   

PostImage

जंगली हत्तींचा कळप पुन्हा झाला ॲक्टीव.....


विहिरगाव-पिपंळगाव शेतशिवारात धुडगूस

 गडचिरोली . कुरखेडा तालुक्यातील वाढोणा शेतशिवारात 31 डिसेंबर रोजी विद्युत शॉक लागल्याने एका मादीचा हत्तीचा मृत्यू झाल्यानंतर जंगली हत्तींचा कळप शोकमग्न अवस्थेत होता. मागील 15 दिवस हत्तींचा कळपाकडून कोणतीही नुकसान झाल्याची घटना समोर आली नव्हती. दरम्यान, देसाईगंज वनपरिक्षेत्रातील विहिरगाव-पिंपळगाव शेतशिवारात हत्तींनी प्रवेश करून पिकांचे नुकसान केल्याची घटना शुक्रवारच्या रात्री उघडकीस आली आहे. पंधरा दिवस शांत असलेला कळप पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

 

पंधरा दिवसांपूर्वी 31 डिसेंबर रोजी वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी वाढोणा येथील शेतकऱ्यानेकुंपणाला विद्युत प्रवाह सोडल्याने या कुंपणाला स्पर्श झाल्याने कळपातील एका मादी हत्तीचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हत्तींचा कळप शांत झाला होता. त्यानंतर कुरखेडा व देसाईगंज तालुक्यात हत्तींकडून कोणतेही नुकसान झाले नव्हते. दरम्यान, शुक्रवारच्या रात्री हत्तींचा कळप देसाईगंज वनपरिक्षेत्रातील विहिरगाव- पिंपळगाव शेतशिवारात दाखल झाला. येथे दाखल होताच हत्तींनी रब्बी पिकाचे नुकसान केल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. हत्तींचा कळप पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून हत्तींच्या कळपावर देखरेख ठेवली जात आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 9, 2024   

PostImage

शंकरनगर येथे रानटी हत्तीच्या हल्ल्यात मृत महिलेच्या कुटुंबियांना १ कोटीची …


रुमदेव सहारे सहसंपादक आरमोरी:-

        तालुक्यातील शंकरनगर  येथे आपल्या शेतात कुटुंबियांसोबत वास्तव्यात असलेल्या श्रीमती कौशल्या राधाकांत मंडल या महिलेवर रानटी हत्तीने हल्ला करून सोंडेत पकडून जमिनीवर आपटले व पायाने तुडवले. यामध्ये ती महिला मृत झाली. त्या मृत महिलेच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीने १कोटी रुपयाची आर्थिक मदत देऊन वारसानांपैकी एकाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरमोरी च्या वतीने राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांना देण्यात आले.
         रविभवन, नागपूर येथील कुटीर क्र.२७ मधील नामदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयात निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर,तालुका अध्यक्ष अमीन लालानी, जिल्हा उपाध्यक्ष चिनी मोटवानी, तालुका कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, युवक तालुका अध्यक्ष दिवाकर गराडे, पवन मोटवानी उपस्थित होते.
       गेल्या दोन वर्षांपासून रानटी हत्तीचा आरमोरी तालुक्यात हैदोस सुरु आहे. आजपर्यंत रानटी हत्तीकडून अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची भरपूर प्रमाणात नासधूस झाली आहे. तर अनेक नागरिकांच्या घरांची सुद्धा स नाशधुस झालेली आहे. रानटी हटत्तीमुळे तालुक्यातील शंकरनगर, जोगीसाखरा, पळसगाव, पाथरगोटा, सालमारा, कणेरी, रामपुरी या भागातील नागरिक दहशतीत आहेत. त्यामुळे रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्यात यावा.
         वनविभागामार्फत  रानटी हत्तीना हाकलून लावण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. हत्ती ज्या परिसरात आहेत त्या परिसरातील नागरिकांना योग्य सुचना व संरक्षण दिल्या जात नाही. म्हणून अशाप्रकारच्या घटना घडून जीवितहानी होत असतात. म्हणून  चौकशी करून दोषी वनाधिकारी यांच्यावर निलंबनाची  कारवाई करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार राजे धर्मरावबाबा आत्राम यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 26, 2023   

PostImage

आले रे आले पाथरगोटा हत्ती आले अन् पाच कुटुंब घर …


गडचिरोली : काही काळासाठी गोंदिया जिल्ह्यात गेलेला रानटी हत्तींचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतला असून आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा गावात रविवारी मध्यरात्री हत्तींनी धुडगूस घातला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पाच कुटुंबांना जीव वाचवण्यासाठी घर सोडून पळ काढावा लागला. हल्ल्यात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.२४ डिसेंबरच्या मध्यरात्री २० ते २२ रानटी हत्ती आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा गावातील पाच घरांवर हल्ला केला. सुरुवातीला अशोक वासुदेव राऊत यांच्या घराला धडक दिली.

 

हत्तीची किंचाळी ऐकून घरातील सर्व सदस्य उठून घराच्या मागच्या दरवाज्याने पळ काढला आणि मोठ्याने आरडाओरड करून शेजाऱ्यांना जागे केले. त्यामुळे या परिसरातील घरातील सर्व सदस्य जीव मुठीत घेऊन घराबाहेर सुसाट धावत सुटले. अशोक राऊत, सूरज दिघोरे, मंगला प्रधान ,चंद्रशेखर बघमारे, दुर्गादास बघमारे यांच्या घरांचीही हत्तींनी नासधूस केली. यानंतर संपूर्ण गाव जागे झाले, पण जीवाच्या भीतीने कोणीही घराबाहेर पडले नाही. गावकऱ्यांनी वनविभागाला कळविले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, वनपाल मुखरु किनेकर ,वनरक्षक बाळू शिऊरकर , रुपा अत्करे , पंढरी तेलंग आदी दाखल झाले. हुल्ला पार्टीच्या मदतीने हत्तीच्या कळपाला हुसकावून लावले. हल्ल्यात घरांचे नुकसान झाले, पण जीवितहानी टळली.

 

 

 

पाच कुटुंबांना निवाऱ्याची व्यवस्था करावी

हत्तीच्या हल्ल्यामुळे पाच कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे समोर जायचे कोठे, रहायचे कसे, खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करुन भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. यापूर्वी शंकरनगर येथे ९ सप्टेंबर रोजी हत्ती पहिल्यांदा दाखल झाले आणि शेतकऱ्यांच्या शेतातील धान्यासह बोअरवेल, इलेक्ट्रिक साहित्यांचे नुकसान केले होते. आता पुन्हा एकदा या भागात हत्तींनी प्रवेश केल्याने शेतकरी दहशतीत आहे.